mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

केंद्राच्या PMFME योजनेचा बुलढाण्यात डंका. खरेदी-विक्रीसाठी MOU करार.: Central Government’s PMFME Scheme Makes Waves in Buldhana: MOU Signed for Procurement and Sales.

शेअर करा :

Central Government’s PMFME Scheme Makes Waves in Buldhana: MOU Signed for Procurement and Sales. :  केंद्राच्या PMFME योजनेचा बुलढाण्यात डंका. खरेदी-विक्रीसाठी MOU करार.

Central Government's PMFME Scheme Makes Waves in Buldhana: MOU Signed for Procurement and Sales.

बुलढाणा दि. 13 मार्च : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन 07 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते. या संमेलनात जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, बचत गट, खरेदीदार आणि विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पादनांना चांगला दर मिळवून देणे आणि उत्पादक व खरेदीदार यांच्यात थेट संपर्क साधणे हे होते. कार्यक्रमादरम्यान विविध उद्योजकांनी आपली उत्पादने प्रदर्शित केली. खरेदीदारांसोबत व्यवसायिक चर्चा झाल्या.

या संमेलनात अन्न प्रक्रिया उद्योजक आणि खरेदीदार यांच्यात खरेदी-विक्रीसंदर्भात सामंजस्य करार (MOU) करण्यात आले. या करारामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्थिर आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळणार आहे. तसेच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे अपेक्षित आहे.

या कार्यक्रमामुळे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार असून शेतकरी, बचत गट आणि उद्योजकांना मोठा फायदा होईल. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने आयोजित या संमेलनाला सहभागी उद्योजक आणि खरेदीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे, कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी (PMFME) कु. संजीवनी कणखर, तंत्र अधिकारी कु. रेणुका पाटील, क्षेत्रीय अधिकारी (PMFME) श्री. अनिल सांगळे आणि जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top