Manisha Kalkumbe from Dorvi secures the second rank among women in the state : डोरवी येथील मनीषा कळकुंबे महिलांमध्ये यांचा राज्यात दुसरा क्रमांक.

मलकापूर पांग्रा : अमोल साळवे
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ सिंदखेडराजा तालुक्यातील डोरवी येथील
येथील मनीषा कळकुंबे यांनी पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी २०० पैकी १५७ गुण मिळवत महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्यांचे केंद्र प्रमुख होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे.
मनीषा कळकुंबे या सध्या जालना जिल्हा परिषद शाळा, खरपुडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. केंद्र प्रमुख पद मिळविण्यासाठी त्यांनी सातत्याने अभ्यास करत आपली जिद्द कायम ठेवली. या पदासाठी सर्वप्रथम शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्यानंतर त्यांनी केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी करून या स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ३ आणि ४ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेस राज्यभरातून एकूण ४६,०६८ उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३८,५५८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते.
या परीक्षेचा निकाल १३ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला. मनीषा कळकुंबे यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. यावेळी त्यांना अभिनंदन म्हणून गावकऱ्यांनी तसेच खरपुडी येथील येथील शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी यांनी व तेथील गावकऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


