mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

तर गावकऱ्यांचा आत्मघात : Villagers mass suicide

शेअर करा :

Villagers mass suicide : दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत फजलपूर-तांडा येथे चालू असलेले स्टोनक्रशर व खनिपट्टा गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे धूळधाण झाली आहे. पिकांवरही परिणाम झाला आहे. हा पट्टा बंद करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


Villagers mass suicide
तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना निवेदन देताना गावकरी

आठ दिवसच प्रशासनाच्या हाती : दत्तपूर-अफजलपूर-तांडा येथील स्टोनक्रशर व खनिपट्टा उठला मुळावर

बुलढाणा  : दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत फजलपूर-तांडा येथे चालू असलेले स्टोनक्रशर व खनिपट्टा गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे धूळधाण झाली आहे. पिकांवरही परिणाम झाला आहे. हा पट्टा बंद करावा तसेच नवीन कोणत्याही स्टोनक्रशर व खनिपट्टाला परवानगी देवू नये, अशी मागणी अफजलपूर-तांडा गावकऱ्यांनी केली आहे. तत्काळ निर्णय न झाल्यास २७ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात गावकऱ्यांनी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल उमरे यांना निवेदन सादर केले आहे.

दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत अफजलपूर-तांडा गावालगत स्टोनक्रशर व खनिपट्टा चालू आहे. त्यासाठी होणाऱ्या टिप्परच्या वाहतुकीमुळे अफजलपूर-देऊळघाट व दत्तपूर-अफजलपूर (तांडा) रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. रस्तावरती मोठ-मोठ खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे दररोज अपघात होवून गावकरी जखमी होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नुकताच शासनाने अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करून अफजलपूर-देऊळघाट रस्ता काम केले. परंतु सदर स्टोनक्रशरसाठी होणाऱ्या टिप्परच्या अवैध वाहतुकीने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच मोठ्या प्रमणात धूळ देखील उडत आहे व यामुळे शेतीची पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी हाल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top