mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लग्नाच्या सोळाव्या दिवशीच दीपकचा दुर्दैवी मृत्यू : Deepaks tragic death on the sixteenth day of his wedding

शेअर करा :

Deepaks tragic death on the sixteenth day of his wedding : थाटामाटात लग्न झाले. नवदाम्पत्य सुखी, संसाराची स्वप्ने रंगवू लागले असतानाच विवाहाच्या अवघ्या सोळाव्या दिवशीच मोताळा तालुक्यातील खरबडी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.


Deepak's tragic death on the sixteenth day of his wedding
दीपक निकाळजे
छत्रपती संभाजीनगर येथे अपघात : खरबडी गावावर शोककळा
मोताळा : थाटामाटात लग्न झाले. नवदाम्पत्य सुखी, संसाराची स्वप्ने रंगवू लागले असतानाच विवाहाच्या अवघ्या सोळाव्या दिवशीच मोताळा तालुक्यातील खरबडी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाच्या दहाव्या दिवशी पुणे येथे कंपनीच्या बैठकीसाठी जात असताना छत्रपती संभाजीनगरजवळ अपघात झाला. अकाली मृत्यूने नववधूसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
दीपक कैलास निकाळजे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोताळा तालुक्यातील खरबडी येथील रहिवासी असलेल्या दीपकने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तो पुणे येथील एका कंपनीमध्ये नोकरीत लागला. दीपकचे लग्न मोताळा तालुक्यातील तरोडा येथील शुभांगीसोबत २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या थाटात पार पडले. घरात आनंदी वातावरण होते. नवदाम्पत्याने सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. दरम्यान, नियतीने डाव साधला. लग्नाच्या दहाव्या दिवशी पुणे येथे कंपनीत बैठक असल्याने दीपक खरबडी येथून दुचाकीने ५ मे रोजी निघाला. बैठकीला हजर राहून तातडीने परतीच्या मार्गाला लागू, अशी आस ठेवून निघालेल्या दीपकच्या दुचाकीला छत्रपती संभाजीनगरजवळ अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहाव्या दिवशी ११ मे रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनानंतर मंगळवार, १२ मे रोजी शोकाकुल वातावरणात दीपकच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे खरबडी निकाळजे कुटुंबीय आणि तरोडा येथील त्याच्या सासरच्या मंडळींवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top