mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सोनम वांगचुक यांना मोर्चाद्वारे पाठिंबा : Support for Sonam Wangchuk through a march

शेअर करा :

Support for Sonam Wangchuk through a march : सोनम वांगचुक यांना मोर्चाद्वारे पाठिंबा

Support for Sonam Wangchuk through a march


खामगावात एसडीओ कार्यालयासमोर           आंदोलन

खामगाव : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी तसेच संविधानाचे रक्षण व्हावे, याकरिता लोकशाही संविधानवादी लोकमंच, महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि संविधानप्रेमी संघटनांच्या वतीने २० जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका केली. नीट परीक्षेतील अनियमितता, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विविध सामाजिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि संविधानवादी संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनात माजी आमदार नानाभाऊ कोकरे, गौतम गवई, संजय बगाडे, जितेंद्र चोपडे, धोंडीराम खंडारे, बाबुराव सरदार, प्रा. एम.आर. इंगळे, प्रकाश धुंदळे, अंबादास वानखडे, किशोर भोसले, स्वप्नील ठाकरे, प्रकाश दांडगे, भीमराव गवई, अतुल सिरसाट, कैलास फाटे, मंगेश भारसाकळे, संघपाल जाधव, विजय बोदडे, बी. डी. धुरंधर, अमोल पाटील, डॉ. उर्मिलाताई ठाकरे, शिला अंभोरे, विशाखा सावंग, सुमनताई थाटे, मंदाताई रायबोले, सुखदेवराव शेगोकार, पांडुरंग राखोडे, श्रीराम गव्हांदे, गजानन हेलोडे, श्रीराम खेलदार, मनोज बोदडे, बाबा काळे, मो. वसीम, मो. आरिफ, अनिल क्षीरसागर, एन. एन. डोंगरे, प्रवीण पहूरकर, नाना हिवराळे, देवराव निंबाळकर, अतुल इंगळे, बळीराम हिवराळे, भारत गवई, कैलास इंगळे, अमोल गव्हाण्दे, सागर धुंदळे, रघुनाथ हेलोडे, प्रमोद धुरंधर, राहुल मनमोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top