Child Marriage Stopped Immediately After Complaint to 112 : ११२ वर तक्रार करताच रोखला बालविवाह किनगाव राजा पोलिसांची कारवाई

बुलढाणा :
११२ क्रमांक नंबर डायल करून तक्रार करताच सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी येथे चौदावर्षीय मुलीचा होणारा बालविवाह पोलिसांनी रोखला. किनगाव राजा पोलिसांनी जलदगतीने ही कारवाई केली.
एका चौदावर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार ११२ क्रमांकावर करण्यात आली. किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दडी येथे हा विवाह होत असल्याने किनगाव राजा पोलिस अलर्ट झाले. ठाणेदार संजय मातोंडकर हे आपल्या सहकाऱ्यांसह वर्दडी येथे पोहोचले आणि नियोजित बालविवाह थांबविण्यात आला. ठाणेदार मातोंडकर यांनी विवाहाशी संबंधितांसह गावातील प्रतिष्ठितांची बैठक घेऊन कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वात सोनल चव्हाण, अतिश सवडे, संदीप डोंगरे, सोनपसारे, सुभाष गीते, शरद म्हस्के यांनी ही कारवाई केली.


