Drishyam Repeats Itself in Mehkar: Mysterious Corpse Exhumed After Three Years : मेहकरमध्ये दृश्यम ची पुनरावृत्ती: तीन वर्षांनी उकरले रहस्यमय शव

युनूस बागवान :
मेहकर, बुलढाणा: ‘दृश्यम’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गुन्हेगारांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सत्य अखेर समोर आलेच. मेहकर तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तीन वर्षांपूर्वी हॉटेलमधेच पुरलेले एक रहस्यमय शव पोलिसांनी बाहेर काढले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही घटना मेहकर येथील मोळा रोडवरील जामगाव शिवारात घडली. २१ एप्रिल रोजी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली मेहकर पोलिसांचा ताफा बाबाभाई कुरेशी यांच्या शेतात भाड्याने दिलेल्या ढाब्याच्या परिसरात दाखल झाला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २०२० मध्ये येथे एका व्यक्तीचा घातपात करून मृतदेह हॉटेल मधे काउंटर खाली पुरण्यात आला होता. ( महादेशा न्यूज ) ही माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, जवळ असलेल्या घटनास्थळी उत्खनन सुरू केले.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर पुरलेले ते शव बाहेर काढले. ( महादेशा न्यूज )तीन वर्षांनंतरही हे रहस्य उलगडल्याने पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. मात्र, हे शव कोणाचे आहे, त्याचा घातपात का आणि कोणी केला, यामागे नेमके काय कारण आहे, हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, लवकरच या गुन्ह्यामागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
या घटनेमुळे मेहकर परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटात जसा नायक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीमुळे सत्य बाहेर येते, त्याचप्रमाणे या घटनेतही गुन्हेगारांनी कितीही प्रयत्न केले असले तरी, कायद्याच्या हातातून ते सुटू शकणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.( महादेशा न्यूज ) पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, लवकरच या गूढ मृत्यूचे रहस्य उलगडेल अशी आशा आहे.


