mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गौंढाळ्यात गोठ्याला आग; तीन लाखाचे नुकसान : Fire breaks out in Goundhala

शेअर करा :

Fire breaks out in Goundhala : गौंढाळा शिवारात एका शेतात १३ मे रोजी दुपारी दोन वाजता गोठ्याला आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले.


Fire breaks out in Goundhala

Fire breaks out in Goundhala

सोयाबीन, स्प्रिंक्लर पाइप, वैरण, टीनपत्रे जळाली

मेहकर : गौंढाळा शिवारात एका शेतात १३ मे रोजी दुपारी दोन वाजता गोठ्याला आग लागून दहा पोते सोयाबीन, ४५ टीनपत्रे, सात ट्रॉली कुटार, स्प्रिंक्लर पाइप, शेती अवजारे शेती उपयोगी साहित्य असे ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.

फर्दापूर येथील शेतकरी किसन लक्ष्मण शिकारे यांचे गौंढाळा शिवारात गट नंबर ९१ मध्ये दोन एकर शेती आहे. तिथेच त्यांचा टिनाचा गोठा आहे. त्या गोठ्याला लागूनच तीन मोठ्या म्हशी बांधलेल्या होत्या. १३ मे रोजी दुपारी दोन वाजता गोठ्याला आग लागली. यामुळे एकच धावपळ उडाली. मेहकर नगर परिषद अग्निशमन दलाची एक तुकडी घटनास्थळावर वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. तोपर्यंत आगीत सर्वकाही जळून खाक झाले. तलाठी तांगडे यांनी पंचनामा केला. आग विझविण्यासाठी नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक सतीश ताजने, नगरसेवक महेश रिंढे यांच्यासह गावकऱ्यांनी मदत कार्य केले.

 

नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्याकडून आर्थिक मदत

मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी आगग्रस्त शेतकऱ्यास रोख दहा हजार रुपये आर्घथिक मदत केली. नगरसेवक सतीश ताजने व नगरसेवक महेश रिंढे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top