mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गॅस सिलिंडरचा स्फोट; घाबरून उडी घेतल्याने विद्यार्थिनी जखमी : gas cylinder explosion

शेअर करा :

gas cylinder explosion; Student injured after jumping in panic : गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने भोजनालय आगीत जळून खाक झाले. शेजारील घरात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने भीतीमुळे उडी घेतल्याने ती जखमी झाली. तर शेजारील टेलरींगच्या दुकानातून कपडे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात शिंपी होरपळून जखमी झाला.


gas cylinder explosion
आगीत जळून खाक झालेले भोजनालय

दुकानातील कपडे काढण्याच्या प्रयत्नात शिंपीही भाजला : आगीत भोजनालय जळून खाक

बुलढाणा : गॅस सिलिंडर स्फोट झाल्याने भोजनालय आगीत जळून खाक झाले. शेजारील घरात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने भीतीमुळे उडी घेतल्याने ती जखमी झाली. तर शेजारील टेलरींगच्या दुकानातून कपडे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात शिंपी होरपळून जखमी झाला. खामगाव शहरानजीक वाडी येथे १७ एप्रिलच्या सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

वाडी येथील अरुण गोविंदराव कोलते (वय ६२) यांच्या आर्या भोजनालयामध्ये अचानक गॅस सिलिंडरने पेटले आणि क्षणातच स्फोट झाला. आग लागून भोजनालय जळाले. खामगाव शहर पोलीस, आरसीपी पथक मदतीसाठी दाखल झाले. नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.

तत्पूर्वी स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. आग भडकलेली असताना शेजारील घरात वरच्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या कादंबरी किरण आचार्य (वय १९) या विद्यार्थिनीने घाबरून गॅलरीतून उडी घेतली. तिच्या हनुवटीला फ्रॅक्चर झाली असून, हातापायालाही दुखापत झाली. भोजनालयालगतचे टेलरिंग दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडेल म्हणून टेलर अशोक गोपाळराव अनोकार (वय ६८) रा. जलंब रोड, वाडी यांनी दुकानातील कपडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केले. यामध्ये त्यांच्या चेहऱ्यासह हात, पाय आणि पाठ भाजली. दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरातही भीती पसरली होती. मात्र, आगीवर नियंत्रण मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top