Youth Congress Holds ‘Nyay Satyagraha’ in Buldhana Against India-US Agricultural Agreement : भारत-अमेरिका कृषी कराराविरोधात बुलढाण्यात युवक काँग्रेसचा ‘न्याय सत्याग्रह’

बुलढाणा दि १७ : केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या कृषी कराराविरोधात बुलढाणा येथे युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले. हा करार भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, तो तात्काळ रद्द करण्याची मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वदिप पडोळ यांनी केली. ( महादेशा न्यूज ) काँग्रेस पक्षाने राज्यभर सुरू केलेल्या ‘शेतकरी न्याय सत्याग्रह’ आंदोलनाचा एक भाग म्हणून, बुलढाण्यात १७ एप्रिल रोजी गांधी भवन प्रांगणात जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
‘शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’: विश्वदिप पडोळ
विश्वदिप पडोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अमेरिकन शेतकऱ्यांना त्यांच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात सबसिडी( महादेशा न्यूज ) मिळते, ज्यामुळे भारतीय शेतकरी त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत. अमेरिकेतील सोयाबीन, मका, कापूस आणि दुग्धजन्य पदार्थ भारतीय बाजारपेठेत आल्यास स्थानिक शेतकऱ्यांना कवडीमोल दरात आपला माल विकावा लागेल. यामुळे स्थानिक बाजार समित्या कमकुवत होतील आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल, तर शेतकरी कर्जात बुडून त्यांना आपल्या शेतजमिनी विकाव्या लागतील. “शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करत आहे. ( महादेशा न्यूज ) शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण असून, हा करार सरकारने तात्काळ रद्द करावा,” अशी मागणी पडोळ यांनी केली.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
भारतीय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम: शिवराज पाटील
युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवराज पाटील यांनी या कराराचे गंभीर परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारत-अमेरिका कृषी करारामुळे अमेरिकन कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे स्वस्त परदेशी माल मोठ्या प्रमाणावर भारतीय बाजारात येईल, परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळणार नाही आणि त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल. भारतातील बहुसंख्य शेतकरी लहान व अल्पभूधारक असून त्यांच्याकडे पुरेशा सुविधा व आधुनिक साधनांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन उत्पादनांशी स्पर्धा करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहे. या करारामुळे भारतीय शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि लघुउद्योगांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
आंदोलनानंतर, ‘शेतकरी विरोधी यूएस ट्रेड डील त्वरित रद्द करा’, ‘शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी द्या’, ‘भारताचा डेटा अमेरिकेला देऊ नका’ या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे संघटन सृजन अभियान समन्वयक अब्दुल हनान, सह समन्वयक वीरेंद्र जगताप, युवक काँग्रेस प्रदेशचे महासचिव विश्वदीप पडोळ, युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवराज पाटील, काँग्रेस नेते संदीप शेळके, तेजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय देशमुख, लक्ष्मणराव घुमरे, समाधान सुपेकर, समाधान आकाळ, देवानंद पवार, अमर कुळे, अचल दिपके, गौरव नाईक, तुषार खरे, संदीप पैठणे, ज्ञानेश्वर डांबरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


