Husband and wife killed : भरधाव वेगातील ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू दुर्दैवी घटना घडली.झाल्याची

टेंभुर्णा शिवारात अपघात : सुखी संसाराच्या स्वप्नाचा अंत
खामगाव : भरधाव वेगातील ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर टेंभुर्णा शिवारामध्ये २७ एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
अतुल बाबुराव सिरसाठ (वय ३२) व पुतणी दीक्षा अतुल सिरसाठ (वय २८) असे दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील मातोडी येथील शिरसाठ दाम्पत्य सध्या खडकी येथे राहत होते. दोघे एमएच ३० बी वाय ०९३२ ने अकोलाकडे जात होते. दरम्यान, टेंभुर्णा शिवारात सुदर्शन ढाब्यासमोर एमपी०९एचएच५९८४ क्रमांकाच्या ट्रक चालकाने दारूच्या नशेत वाहन चालवून दुचाकी ला धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत दीक्षाचे काका शांताराम इंगळे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) व मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणी आरोपी ट्रकचालक मुकेश मांगीलाल तिवारी (वय ३८ रा. खांडवा, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.
अपघातामध्ये शिरसाठ पती-पत्नीच्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला. यामुळे शिरसाठ कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. माहेर आणि सासर अशा दोन्ही परिवारात दुःखाचे सावट पसरले आहे.


