mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धी वर लुटमार दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद : Inter-state Gang of Robbers Preying on Samruddhi Expressway Apprehended

शेअर करा :

Inter-state Gang of Robbers Preying on Samruddhi Expressway Apprehended : ‘समृद्धी’वर लुटमार; दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Inter-state Gang of Robbers Preying on Samruddhi Expressway Apprehended
स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई

बुलढाणा : 

गुजरातच्या एका धान्य व्यापाऱ्याचे १२ लाख रुपये घेणाऱ्या जाणाऱ्या नोकरास समृद्धी महामार्गावर मारहाण करून लुटणाऱ्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील आठ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, जम्मू काश्मीर या राज्यातील हे कुख्यात आरोपी आहेत. या कारवाईत देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे ४, रोख १ लाख ८० हजार रुपये इनोव्हा गाडी, बोलेरो गाडी, चार मोबाइल, दोन वायफाय डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात येणाऱ्या लवानाचे रहिवासी असलेले अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय ३२) हे धान्य व्यापाऱ्याकडे काम करतात. मालकाचे धान्य व्यापाराचे ते १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच-०१-ईजे-३७६८)ने नागपूर येथून उंडा (गुजरात) ला जाण्यासाठी समृद्धी महामार्गाने निघाले होते. २ मे रोजी पावणेदहाच्या सुमारास दुसरबीड टोलनाक्याच्या समोरील पुलावर वाहनाच्या टायरमधील हवा चेक करीत असताना पाठीमागून एक न्यू बोलेरो व एक इनोव्हा गाडीमधून आलेल्या दहा ते बारा जणांनी वाघेला यांना मारहाण सुरू केली. बंदूक रोखून धरत मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. नंतर त्यांच्या गाडीत बसवून वाघेला यांची गाडी व रोख १२ लाख रुपये हिसकावून घेतले.

आणखी बातमी वाचण्यासाठी खाली लिंक ला  क्लिक करा https://mahadesha.com/

दरम्यान, किनगाव राजा व स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला. एलसीबीचे पीआय सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथके रवाना करण्यात आली. ३ मे रोजी पथकाने आरोपींची विविध स्तरांवर माहिती घेतली असता दरोडेखोर हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात जीवघेण्या हत्यारांसह लपून बसल्याची आणि तेथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पीआय सुनील अंबुलकर यांनी शीघ्रपणे हालचाल करून, स्वत: पथकासह अंबाजोगाई येथे पोहचले. पथकाला योग्य त्या सूचना देऊन व कारवाईचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून, गुन्ह्यामध्ये आंतरराज्य टोळीतील सदस्य असलेल्या आठ आरोपींना मोठ्या धाडसाने अटक केली.

 

जंगलात सोडले

दरोडेखोरांनी वाघेला यांना वाहनात बसवून जालन्याच्या दिशेने नेले. जालना जिल्ह्याच्या हद्दीत गेल्यानंतर आरोपींनी त्यांना जंगलात सोडून देण्यात आले. तेथून कसेबसे किनगाव राजा पोलीस ठाणे गाठून अभयसिंह वाघेला यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बीएनएस कलम ३१० (२), ३११, १४० (२) नुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला.

 

अटकेतील दरोडेखोरांची नावे

हिंमतसिंग कुंदनसिंग जुनी (वय २८, रा. अंबाजोगाई जि. बीड), मुन्ना केशवकुमार वर्मा (वय ३०, नालासोपारा, ह.मु. पंचकुआ, तहसील लखीमपूर जि. खिरी (उत्तर प्रदेश), मनोज सर्जेराव कुटे (वय ३३, साखरे बोरगाव ता. जि. बीड), मो. रशिद नुरदिन गुज्जर (वय १९, रा. ढोकली ता. जि. पुंछ (जम्मु कश्मीर), सचिन बुधाजी शिर्के (वय ४०, रा. शिरवली ता. माणगाव जि. रायगड), हरीश तोमर देवळीकर (वय ४४, रा. बजकोली ता. तारकलाजि. उडपी (कर्नाटक), अरुणकुमार रामनरेश यादव (वय २८ रा. अंजनी, पो.स्टे. महेशगंज, तहसील कुंडा, जि. प्रतापगड (उत्तर प्रदेश), जसपालसिंग केसरसिंग झाला (वय २५, रा. दरबार मढ गुंजला ता. देनोज जि. अहमदाबाद, गुजरात).

 

टीम एलसीबीला यश

जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पीएसआय प्रताप बाजड, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, शरद गिरी, दिगंबर कपाटे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे, गजानन गोरले, मनोज खरडे, सुरेश भिसे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ राजू आडवे, ऋषी खंडेराव यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बंटेवाड, दिलीप गित्ते, रामचंद्र केकान, गोविंद भताने यांनी तपासकार्यात सहकार्य केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top