mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दिल्लीतील लाठीचार्जच्या विरोधात बुलढाण्यात जोरदार आंदोलन : Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.

शेअर करा :

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi. :दिल्लीतील लाठीचार्जच्या विरोधात बुलढाण्यात जोरदार आंदोलन

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.


NEET पेपरलीक प्रकरणातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

 

बुलडाणा, दि. २२ जुलै : दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET पेपरलीक प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, तरुण वर्ग, महिला तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत NEET पेपरलीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.

यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक व जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

Massive protest in Buldhana against the lathi-charge in Delhi.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top