mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सरोवराच्या वाढत्या  पाण्यावरून आमदार खरात यांचा विधिमंडळात संताप : MLA Kharats anger in the legislature over the rising water level of the lake

शेअर करा :

MLA Kharats anger in the legislature over the rising water level of the lake : जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराच्या वाढत्या जलपातळीचा विषय मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळ सभागृहात मांडला.

MLA Kharats anger in the legislature over the rising water level of the lake
MLA Kharats anger in the legislature over the rising water level of the lake



लोणार : जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवराच्या वाढत्या जलपातळीचा विषय मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळ सभागृहात मांडला. प्रशासकीय उदासीनतेमुळे सरोवराचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगत वन विभागाच्या आडमुठ्या धोरणावरही खरातांनी टीका केली. वेळीच सरोवर वाचविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली.
सरोवराची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वाढती जलपातळी हा सरोवराच्या दृष्टीने घातक प्रश्न बनला आहे, असे सांगत आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे आणि वन विभागाच्या परवानग्या रखडल्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे नुकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त समितीने एकदाही सरोवराची पाहणी केली नसल्याबद्दलही खरात यांनी रोष व्यक्त केला.

४१ लाखांचा निधी मंजूर; काम मात्र ठप्प
सरोवरातील वाढीव पाणी उपसा करण्यासाठी आणि धारतीर्थातील गोमुखाचे पाणी वळवण्यासाठी ४१ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, वन्यजीव विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्यात समन्वय नसल्याने कामाला सुरुवात झाली नाही. वन्यजीव विभाग दाद देत नाही आणि लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, अशा शब्दांत आ. खरात यांनी संताप व्यक्त केला.

विकास आराखड्यात सुविधांचा अभाव
लोणार शहराच्या विकास आराखड्यावर बोलताना खरात म्हणाले, पर्यटकांच्या सोयीसाठी शहरात उद्यान, पॅराग्लायडिंग, तारांगण, मोठा टेलिस्कोप, रोपवे आणि चांगले रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या आराखड्यात तत्काळ सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लोणार विकासासाठी मंजूर ४३४ कोटींपैकी १७४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील १८० कोटी रुपये सरोवरासाठी खर्च केले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top