Verification of actual voters by BLO : मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मतदारांचे मॅपिंगची प्रक्रिया केली जात आहे. या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष मतदारांची पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जावून भेट देत आहेत.

आई-वडिलांसह आजी-आजोबांचे नाव शोधून बीएलओंकडे द्या : उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांचे आवाहन
बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मतदारांचे मॅपिंगची प्रक्रिया केली जात आहे. या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष मतदारांची पडताळणी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जावून भेट देत आहेत. पडताळणीसाठी स्वतःचे किंवा आई-वडील, आजी-आजोबा यांचे नाव शोधून बीएलओंकडे द्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.
प्रत्येक मतदारास सन २००२ च्या मतदार यादीतील आपले किंवा आपले वडील/आई/आजोबा/आजी यांच्या नावाची आवश्यकता भासणार आहे. तसेच दोन पासपोर्ट आकाराचे अद्ययावत रंगीत छायाचित्र व आयोगाने निर्धारित केलेल्या १३ कागदपत्रांपैकी जन्म तारखेनुसार कागदपत्राची आवश्यकता भासणार आहे. सद्यस्थितीत पूर्व तयारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) २९ ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीचे सन २००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंगचे काम करीत आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मोबाइलद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून मतदारांकडून सन २००२ च्या यादीबाबत माहिती गोळा करीत आहेत. तसेच मतदार यादीतील फोटो/नाव/वय/लिंग या बाबत दुरुस्तीसाठी मतदारांशी संपर्क करीत आहे.
२२-बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना सहकार्य करावे. सन २००२ च्या मतदार यादीतील आपले किवां आपले वडील /आई/आजोबा/आजी यांची नावे शोधण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या http://ceoelectiol.maharashtra.gov.in/ या वेब साइटवरील “एसआयआर” २००२ या टॅबवर किंवा भारत निवडणूक आयोगाच्या httph://voters.eci.gov.in/searchinSIR या वेबसाइटवर जाऊन सर्च युवर नेम इन लास्ट “एस आय आर” या टॅबवर लिंक करून शोधता येईल. मतदारांनी आपले किंवा आपले वडील /आई/आजोबा/आजी यांचे सन २००२ च्या मतदार यादीतील आपले नाव शोधून ते आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.


