Raid on brothel in Hotel Ekant : मेहकर शहरातील बायपास रोडवर बाई आणि बाटली असे अय्याशी केंद्र बनविलेल्या हॉटेल एकांत व लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. महिलांकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली.

- मेहकर बायपासवर सुरू होता अड्डा : पोलिसांनी केला पर्दाफाश
मेहकर : शहरातील बायपास रोडवर बाई आणि बाटली असे अय्याशी केंद्र बनविलेल्या हॉटेल एकांत व लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. महिलांकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली. १५ मार्चच्या रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. देहव्यापार चालविणाऱ्यासह लॉज भाड्याने देणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
मेहकर बायपासवर अर्धवट बांधकाम झालेल्या एकांत हॉटेल ॲण्ड लॉजिंग नावाच्या इमारतीच्या तळमजल्याखालील रुममध्ये महिला व मुलींकडून राजरोसपणे देहव्यापार चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांनी वरिष्ठांना माहिती देत पथक नेमून १५ मार्चच्या रात्री साडेअकरा वाजता छापा मारला. यावेळी महिलांकडून कुंटणखाना चालविणाऱ्या प्रमोद धनसिंग पवार (रा. बीबी, ता. लोणार) याला पकडण्यात आले. तसेच दोन महिला आढळून आल्या. आरोपी प्रमोद पवार तसेच लॉजमालकविरुद्ध मेहकर पोलिसांत अनैतिक व्यापास प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५, ६, ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. व्यंकटेश्वर आलेवार, पीएसआय कांचन जारवाल, पोहेकॉ लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शिवानंद केदार, पोलिस शिपाई मोहंमद परसुवाले, करीम शहा, शिवाजी चिम, विनोद फुफाटे, आम्रपाली सरकटे तसेच होमगार्ड सचिन इंगळे, सुनील काटकर, उमेश देबाजे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
- डमी ग्राहक पाठवून खात्री
माहिती प्राप्त होताच डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.


