mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धीवर धावत्या लक्झरीमध्ये चालक वाहकाची रील : वाहन उलटून बालक ठार, अनेक प्रवासी जखमी : Reel of a driver in luxury running on prosperity

शेअर करा :

Reel of a driver in luxury running on prosperity : समृद्धी महामार्गावर धावत्या लक्झरी बसमध्ये रील बनविणाऱ्या चालक व वाहकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. त्यांची मौजेची रील एका बालकाच्या जीवावर घेतली. या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.


Reel of a driver in luxury running on prosperity
उलटलेली लक्झरी बस

Reel of a driver in luxury running on prosperity

मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोलजवळ भीषण अपघात

 


आसिफ शाह


मेहकर : समृद्धी महामार्गावर धावत्या लक्झरी बसमध्ये रील बनविणाऱ्या चालक व वाहकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. त्यांची मौजेची रील एका बालकाच्या जीवावर घेतली. या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्यावर रविवार, १९ एप्रिल २०२६ च्या पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंबई येथून एमएच २९ बीई ३२३३ क्रमांकाची लक्झरी बस पुसदकडे समृद्धी महामार्गाने निघाली होती. बसचा मेहकर (महादेशा न्यूज) तालुक्यातून प्रवास सुरू असताना चालक आणि वाहक मोबाइलवर रील बनवित होते. दोघांनीदेखील प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. फर्दापूर टोल नाक्याजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटून लक्झरी बस उलटली.
लक्झरी बस उलटल्याने पियुष यशपाल राठोड हा बालक ठार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली. (महादेशा न्यूज) अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेने सरकारी व खासगी रुग्णालयात पाठविले. जखमींची नावे व गावाची माहिती अद्याप समजू शकली नाही.

कारवर कोसळून चौघे जखमी

Reel of a driver in luxury running on prosperity

लक्झरी बसच्या चालकाचा निष्काळजीपणा कारमधील चार जीवावरदेखील बेतला. मेहकरकडून नागपूरकडे निघालेल्या एमएच ४० डीई १३४८ क्रमांकाच्या कारवर (महादेशा न्यूज) समोरील बाजूने बस निसटती कोसळली. या अपघातात जीवित हानी झाली नसलीतरी कारमधील रूपचंद गजानन बावनकुळे व त्यांचे कुटुंब जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top