mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

निर्दयतेने गोवंशांची वाहतूक; ग्रामस्थांनी केली सुटका : Ruthlessly transporting cattle; Villagers rescued

शेअर करा :

Ruthlessly transporting cattle; Villagers rescued : गायींसह गोवंशांची वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. एक गाय, तीन वासरे, एक म्हैस व रेडा अशा गुरांची सुटका करण्यात आली.♥

Ruthlessly transporting cattle; Villagers rescued

धामणगाव बढे येथे दोघांना पकडले

मोताळा : गायींसह गोवंशांची वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. एक गाय, तीन वासरे, एक म्हैस व रेडा अशा गुरांची सुटका करण्यात आली. धामणगाव बढे ते लालमाती रोड सहकार विद्या मंदिरासमोर १५ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. विशाल किसन गार्वे (वय ३६, किन्होळा ता. मोताळा) व शेख रईस शेख युनुस कुरेशी (वय ३२, बडा मोहल्ला धामणगाव बढे) अशी गोवंशना कोंबून नेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. एमएच २८ – ९१७८ क्रमांकाच्या वाहनातून गुरांची वाहतूक केली जात होती. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय आल्याने धामणगाव बढे येथील ग्रामस्थांनी वाहन अडवून दोघांना पकडून ठेवले. आरोपींच्या ताब्यातून एक गाय, तीन वासरे, एक म्हैस व रेडा यांची सुटका केली. तसेच वाहन जप्त करण्यात आले. पोहेकॉ राजेंद्र राणे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध बीएनएस कलम २८१ सहकलम १२ (१), ११ (१), १ (१), ११ (१), (डी), ११ (१) (ई), ११ (१) (एच) प्राण्याचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद बाठे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top