Woman beaten by two people who entered the house :

खामगाव : घरात शिरलेल्या महिला व पुरुषाने एका महिलेस किरकोळ कारणावरून इ मारहाण केली. खामगाव तालुक्यातील नागापूर येथे ही घटना घडली.
नागापूर येथील रंजना भीमराव इंगळे या १४ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रुग्णालयातून घरी परतल्या. त्यांना घरात मोठ्या प्रमाणात पसारा दिसला. त्यांनी पतीला विचारणा केली असता, आरोपी एकनाथ वाकोडे व संतोषी वाकोडे हे घरात आल्याचे समजले. तसेच पलंगाखाली ठेवलेले पैसेही गायब होते. आरोपी सत्यपाल वाकोडे यांना विचारणा केली असता, आरोपी संतोषी वाकोडे हिने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून रंजना यांना मारहाण केली. झटापटीत खाली पडल्याने जखमी झाल्या. यांच्या तक्रारीवरून सत्यपाल सुपाजी वाकोडे, एकनाथ सुपाजी वाकोडे व संतोषी सत्यपाल वाकोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५ (२), ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.


