mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जीवनसाथी बनण्याआधीच लैंगिक अत्याचार : Sexual Abuse Before Becoming Life Partners

शेअर करा :

Sexual Abuse Before Becoming Life Partners : जीवनसाथी बनण्याआधीच लैंगिक अत्याचार

Sexual Abuse Before Becoming Life Partners


           सैन्यातील जवानाविरुद्ध गुन्हे दाखल

खामगाव

जीवनसाथी ॲपच्या माध्यमातून ओळख वाढविली. प्रेमाच्या गुलू गुलू गोष्टी केल्या आणि तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. जीवनसाथी बनण्याआधीच सैन्यातील जवानाने तिचे सर्वस्व लुटले. खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

कपिल हिवराळे (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील अंबिकापूरचा रहिवासी असलेला हा जवान मध्य प्रदेशात कार्यरत आहे. जीवनसाथी ॲपवरून त्याने तरुणीशी ओळख वाढविली. आपण लग्न करू, असा शब्द दिला. तीनेदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला. १ सप्टेंबर २०२५ पासून आजपर्यंत आरोपीने शेगाव रोडवरील हॉटेलात वारंवार भेटी घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच विश्वासात घेऊन पीडित तरुणीकडून रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार आणि सोन्याची चेन अशा स्वरूपात एकूण ९ लाख १४ हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

तसेच लग्नास नकार देत शिवीगाळ करून धमक्या दिल्या, अशी तक्रार पीडितेने शहर पोलिसांत दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६९, ६४ (२) (एम), ३१८ (४), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top