mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांचे अभिवादन : Speaker Ram Shinde pays tribute to the revered Rajmata Ahilyadevi Holkar.

शेअर करा :

Speaker Ram Shinde pays tribute to the revered Rajmata Ahilyadevi Holkar. : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सभापती राम शिंदे यांचे अभिवादन

Speaker Ram Shinde pays tribute to the revered Rajmata Ahilyadevi Holkar.


बुलढाणा, दि. ४ : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील तहसील चौक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सभापती राम शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, समाजसेवा आणि विकासाभिमुख धोरणांमुळे अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श समाजाने स्वीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

सभापती श्री. शिंदे हे एकदिवसीय बुलढाणा दौऱ्यावर असताना या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्म, शिक्षण, समाजसेवा, लोककल्याण आणि विकासकामांना प्राधान्य देत आदर्श प्रशासनाची परंपरा निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सार्वजनिक सुविधा उभारण्यात आल्या. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा आजही समाजाला दिशा देणारा ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top