mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बच्चे कंपनीच्या नोटा देऊन अभ्यासिका चालकाची फसवणूक : Student cheats driver by giving him company notes

शेअर करा :

Student cheats driver by giving him company notes : ५० हजारांचे पाच लाख रुपये देण्याचे आम्ही दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका अभ्यासिका चालकास ५० हजार रुपये घेऊन लुबाडण्यात आले. 

Student cheats driver by giving him company notes

५० हजारांत ५ लाख देण्याचे दाखविले आमिष

खामगाव : ५० हजारांचे पाच लाख रुपये देण्याचे आम्ही दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका अभ्यासिका चालकास ५० हजार रुपये घेऊन लुबाडण्यात आले. खामगाव तालुक्यात हा प्रकार घडला.

गणेश रविंद्र सोनवणे (वय २४, अभ्यासिका चालक, रा. गोकुळवाडी, औरंगपुरा, ज्योतिबा फुले चौक, छत्रपती संभाजीनगर)  असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी मोबाल क्रमांक 9109869296 व 9673464309 वरून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. त्यांनी ५० हजार रुपये दिल्यास ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे बोलाविले. आरोपींनी ५० हजार रुपये  जेवण ‘बच्चो की बँक’ असे लिहिलेल्या ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या नकली नोटांचे एकूण ५ लाख रुपयांचे बंडल देऊन त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८, ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  ५ मार्च २०२६ रोजी पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top