Union Minister Ramdas Athawale felicitated for being nominated to Rajya Sabha for the third time : राज्यसभेवर तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल रामदास आठवले यांचा बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने सत्कार करण्यात आला.

बुलढाणा जिल्हा रिपाइंने केला गौरव
बुलढाणा : भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा संपर्कप्रमुख, पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअर प्रा. भय्यासाहेब पाटील, मराठा नेते रामभाऊ शिंदे, सागवन ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष मिसाळ, रिपाइं अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, तालुकाध्यक्ष केशव सरकटे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, चिखली तालुकाध्यक्ष हिंमतराव जाधव, आडगाव राजा सरपंच, पत्रकार रामदास कहाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचा सत्कार केला.


