mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

स्वातंत्र्यदिनाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाची बेदम मारहाण : Teacher severely beats students preparing for Independence Day 

शेअर करा :

Teacher severely beats students preparing for Independence Day : स्वातंत्र्यदिनाची तयारी करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. अर्वाच्च शिवीगाळ करीत अपमान केला. हे प्रकरण धमकावून दडपण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांवरील अत्याचाराची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला प्राप्त होताच सूत्रे हलली आणि आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.


Teacher severely beats students preparing for Independence Day
AI चित्र

देऊळगाव साकर्शा येथील घटना : चाइल्ड हेल्पलाइन धावली मदतीला : शिक्षकाविरुद्ध गुन्हे दाखल

बुलढाणा : स्वातंत्र्यदिनाची तयारी करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. अर्वाच्च शिवीगाळ करीत अपमान केला. हे प्रकरण धमकावून दडपण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांवरील अत्याचाराची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला प्राप्त होताच सूत्रे हलली आणि आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे ही घटना घडली.

प्रवीण बाळकृष्ण नगरनाईक असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. देऊळगाव साकर्शा येथील सरस्वती विद्यालयात नववीमध्ये शिकणाऱ्या सहाविद्यार्थ्यांना १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चापटा व बुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांचा जाहीर अपमान केला. अश्लील शिवीगाळ केली. याबाबत महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत चाइल्ड हेल्प लाइन जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे माहिती प्राप्त झाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल दिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच चाइल्ड हेल्प लाइनचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी तत्काळ कारवाई सुरू केली. पर्यवेक्षक सागर नरवाडे, केस वर्कर मुकेश मोरे, केस वर्कर यांनी जानेफळ पोलिस स्टेशनला भेट दिली. एका पालकाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक प्रवीण नगरनाईक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ च्या कलम ७५ (अल्पवयीन बालकांचे संरक्षण कायदा) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. काळजी आणि संरक्षणच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना बाल कल्याण समितीसमोर २० ऑगस्ट रोजी चाइल्ड हेल्प लाइन मार्फत हजर करण्यात आले. समितीने जबाब नोंदवून बालकांचे समुपदेन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top