mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गिरडा येथे मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी बसविणार AI आधारित कॅमेरे : AI-based cameras to be installed at Girda to prevent human-wildlife conflict

शेअर करा :

AI-based cameras to be installed at Girda to prevent human-wildlife conflict : गिरडा गावात वारंवार घडणाऱ्या मानव–वन्यप्राणी (बिबट्या) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा संघर्ष कमी करण्यासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित कॅमेरे बसविण्यात येणारh.


AI-based cameras to be installed at Girda to prevent human-wildlife conflict op
दिल्ली येथून आलेली टीम पाहणी करताना

दिल्लीच्या टीमने केली पाहणी

बुलढाणा : बुलढाणा वन विभागांतर्गत गिरडा गावात वारंवार घडणाऱ्या मानव–वन्यप्राणी (बिबट्या) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. जिल्हा उपवन संरक्षक जमीर मुनीर शेख यांच्या संकल्पनेतून गिरडा गावात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत दिल्ली येथील तज्ज्ञांचा टीमने आज गिरडा गावाची पाहणी केली. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावकऱ्यांनाm कशा प्रकारे फायदा होईल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रणालीमुळे गावालगत किंवा गावात वन्यप्राणी आढळल्यास संबंधित माहिती तत्काळ गावकऱ्यांना मोबाइल संदेश, व्हिडीओ क्लिप तसेच व्हॉइस अलर्टच्या स्वरूपात प्राप्त होणार आहे. त्यामुळे नागरिकांना 6 भागात जाण्यापासून सावध करता येईल व संभाव्य संघर्ष टाळता येईल.

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार असून, गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पाहणीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे, वनरक्षक विक्रम राऊत, गजानन शिंदे, संदीप मडावी, हिवाळे तसेच गिरडा गावाचे सरपंच किशोर गायकवाड, समिती सदस्य राजू गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top