The economic cycle was consumed by fire : चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अग्नीतांडव घडले.


चिखलीतील आगीत सहा दुकाने जळाली
चिखली : शहरातील जयस्तंभ चौक परिसरात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अग्नीतांडव घडले. लागलेल्या आगीत सहा ते सात दुकाने जळून मोठी हानी झाली.
भेळ सेंटर, फळांच्या दुकानांसह एक घड्याळ दुरुस्तीचे दुकान, कृषी केंद्र आणि इतर काही लहान व्यावसायिकांची दुकाने आगीत जळून खाक झाली. दुकानांना लागूनच मोठा बाजार परिसर असल्याने एकच धावपळ उडाली.
अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दुकाने जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, कुणाल बोंद्रे, काशिनाथ बोंद्रे, सलिम मेमन, गोपाल देव्हढे, सुरेंद्र ठाकूर, सुहास शेटे, राम बनसोडे, उमेदअली खान, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
यांची जळाली दुकाने
आगीत दीपक बोंद्रे, प्रद्युम्न श्याम भिमेवाल, जयंतीभाई सुतारीया, बाळू हांडगे, राजू राजपूत यांची दुकाने जळून खाक झाली.
एका दुकानात गॅस सिलिंडर होते. आगीमुळे स्फोटाची भीती पाहता व्यापाऱ्यांनी तातडीने सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे अर्थ कळला.


