mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पिकअपच्या धडकेत युवक ठार एक गंभीर : Youth Killed, One Seriously Injured in Pickup Collision

शेअर करा :

Youth Killed, One Seriously Injured in Pickup Collision : पिकअपच्या धडकेत युवक ठार, एक गंभीर 

Youth Killed, One Seriously Injured in Pickup Collision
वाशीम जिल्ह्याच्या पिंप्री सरहद्दजवळील घटना

डोणगाव : 

पिंप्री सरहद्द : मेहकर–मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द येथे २० मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दुचाकी व पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील दोन्ही युवक हे मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील रहिवासी असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील राधेश्याम वामन इंगळे व संतोष शिंदे हे मेहकरकडून मालेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात राधेश्याम इंगळे याचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष शिंदे गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी संतोष शिंदे याला उपचारासाठी वाशिम येथे रेफर केले तर अपघातानंतर पिकअप वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अखेर केनवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी युवकाला तत्काळ वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातानंतर फरार झालेल्या पिकअप वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top