Possibility of a celestial disaster hitting the state : विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चार दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा अंदाज : हवामान खात्याची माहिती
बुलढाणा : राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हा कहर शेतकऱ्यासंह जनतेला सोसावा लागणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्चदरम्यान आस्मानी संकट अधिक तीव्रतेने येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


