A broken power line broke the thread of life : पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतात वीजवाहिनीच्या तुटलेल्या वीजप्रवाहित तारेचा शॉक लागून मृत्यू झाला.

करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू
देऊळगाव राजा : पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतात वीजवाहिनीच्या तुटलेल्या वीजप्रवाहित तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. रविवार, १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद फाटा शिवारात ही घटना घडली.
अश्रूबा ज्ञानबा घुले (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लोणार तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी असलेले घुले हे मागील काही वर्षांपासून आळंद येथे आपल्या नातेवाइकांकडे राहत होते. त्यांनी आळंद परिसरातील शेती बटईने घेतली होती. १५ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या तुटून पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने जोराचा करंट लागून अश्रूबा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाइकांसह गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.


