Nitin Sakhare dies in an accident in Chhattisgarh. : छत्तीसगडमध्ये अपघातात नितीन साखरे यांचा मृत्यू

चिखली, दि. २९ (प्रतिनिधी)
छत्तीसगडमधील रायपूर येथे नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था) मध्ये वरिष्ठ क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या शेलूद येथील नितीन भास्कर साखरे यांचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला. २७ एप्रिल रोजी सकाळ ही दुर्घटना घडली.
हलाखीच्या परिस्थितीत शालेय शिक्षण घेत असताना वर्तमानपत्रे वाटप करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. संघर्षातून घडलेला, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख होती.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
कार्यालयीन कामानिमित्त छत्तीसगड येथे गेले असताना जांजगीर परिसरात त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे. २८ एप्रिल रोजी त्यांच्यावर शेलूद येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहीण नातेवाइक व मित्र परिवार असा परिवार आहे.


