mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

संविधानाचा जागर करूया, महिलांच्या सन्मानासाठी : Let’s wake up to the Constitution, for the respect of women

शेअर करा :

 

Let’s wake up to the Constitution, for the respect of women : संविधानाचा जागर करूया, महिलांच्या सन्मानासाठी.

Let's wake up to the Constitution, for the respect of women

बुलढाणा  : जागतिक महिला दिनाच्या ८ मार्च निमित्ताने प्रगती सार्वजनिक वाचनालय आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात “उपेक्षित महिलांच्या जीवन संघर्षाचा सन्मान” करण्यात आला. या कार्यक्रमात शिलाताई पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून भावनिक आवाहन केले –

Let's wake up to the Constitution, for the respect of women

“समानता, स्वातंत्र्य आणि सन्मान हे फक्त संविधानातील शब्द नाहीत, तर स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्त्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले आहेत, पण त्याचा खरा अनुभव तेव्हाच येईल जेव्हा समाज म्हणून आपण ते मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू.

त्यांनी पुढे म्हटले, “अन्यायाविरोधात आवाज उठवणे, स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि समानतेसाठी संघटित होणे – हेच संविधानाच्या मूल्यांचे खरे पालन आहे.”

Let's wake up to the Constitution, for the respect of women

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा कारागृह अधीक्षक मेधाताई बाहेकर उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले,

“हक्क आणि अधिकारांचे संरक्षण फक्त कायद्याने होत नाही, तर समाजाच्या सामाजिक-नैतिक जाणिवेमुळे होते. संघर्षाशिवाय आजपर्यंत स्त्रीला काहीच मिळालेलं नाही – हा आजवरचा इतिहास आहे. मंचावर नवनिर्वाचित नगरसेविका दिव्यांगना ताई ठाकरे, प्रा. डॉ. कि. वा. वाघ, CITU राज्य सहसचिव पंजाबराव गायकवाड, सुनिताताई जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात विशेषत्वाने अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका आणि शालेय पोषण आहार कामगार या क्षेत्रातील २१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या महिला अल्प वेतनात, प्रामाणिकपणे काम करत असूनही समाजात ‘उपेक्षित’ राहिल्या आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाला मान्यवरांच्या हस्ते सलाम करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात शारदा लिंगायत यांच्या सुंदर स्वागत गीताने झाली. शाहीर डि. आर. इंगळे यांनी महिलांच्या सन्मानाला जागृत करणारे प्रेरणादायी गीत सादर केले. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर केणे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला सुरेश साबळे, प्रा. प्रतापराव सपकाळ, डॉ. इंदूमती लहाने यांच्यासह जिल्हाभरातील अनेक महिला कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांनी केले, तर प्रगती वाचनालयाचे पुरुषोत्तम गणगे यांनी आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top