The time had come but… :


उभ्या कारला बोलेरोची धडक; जीवितहानी टळली
बुलढाणा : भरधाव बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी आली नाही. बुलढाणा ते अजिंठा मार्गावर दत्तपूरजवळ मंगळवारी दुपारी हा अपघात घडला.
एमएच-२८-व्ही-६४६१ क्रमांकाच्या बोलेरो गाडीने एमएच-२८-व्ही-८५६१ क्रमांकाच्या आय ट्वेंटी या कारला जोराची धडक दिली. यामुळे कर रस्त्याखाली गेली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. प्रवाशांवर आलेले मोठे संकट थोडक्यात टळले. ‘काळ आला होता… पण वेळ आली नव्हती’ याची प्रचिती आली.


